अंकिता लोखंडे Photos

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.


शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.


ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.


Read More
ekta kapoor
14 Photos
Diwali Party: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांचा मेळा, सोनाक्षी सिन्हा, हिना खान, सुझैन खान उपस्थित

एकता कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Ankita Lokhande
12 Photos
Photos : पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचा पतीसोबत मालदीवमध्ये रोमान्स, फोटो व्हायरल

Ankita Lokhande latest Romantic Photos went viral: टीव्हीच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक अंकिता लोखंडे सध्या परदेशात सुट्टी घालवत आहे. जिथे ती…

marathi actors celebrate ganesh chaturthi at home
11 Photos
Ganeshostav 2024: गणपती बाप्पा मोरया!, ‘या’ मराठी सिनेकलाकारांच्या घरी वाजत गाजत झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

Ganesh Cgaturthi 2024: आज गणेश भक्तांमध्ये गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान सिने कलाकारांचा बाप्पाही आता त्यांच्या घरी विराजमान…

ankita lokhande and vicky jain lavish home in mumbai see inside photos
15 Photos
होम थिएटर, स्विमिंग पूल अन्…; अंकिता लोखंडे-विकी जैनच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का? नाव ठेवलंय खूपच खास

प्रशस्त खोल्या, पांढऱ्या रंगाची थीम अन्…; ‘असं’ आहे अंकिता – विकीचं मुंबईतील आलिशान घर, फोटो व्हायरल

ankita lokhande real name 1
12 Photos
राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती अंकिता लोखंडे; खरं नाव बदलून आली मनोरंजन क्षेत्रात, जाणून घ्या अधिक

Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे हिच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या