अंकिता लोखंडे Videos
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.
शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.
ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.
Read More