अंकुश चौधरी

अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. अंकुश चौधरीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९७३ रोजी झाला. अंकुशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तो सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. नंतर त्याने एकांकिका, स्पर्धा, नाटक आणि मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली.


अंकुशने केदार शिंदेबरोबर केलेल्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकाला खूप यश मिळाले होते. त्यात अभिनेत्री दीपा परबदेखील अभिनय करीत असे. याच काळात अंकुश व दीपा यांच्यातील जवळीक वाढली आणि जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगाही आहे. अंकुशचे गोपाळा रे गोपाळा हे नाटकदेखील खूप गाजले होते. तसेच १९९९ मध्ये अंकुशने ‘हसा चकट फू’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सून येता घरी या चित्रपटातून अंकुशची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. जिस देश में गंगा रहता है या गोविंदाच्या हिंदी चित्रपटातही अंकुशने छोटी भूमिका साकारली होती. सावरखेड एक गाव, आई शप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, संशयकल्लोळ, चेकमेट, गैर, ब्लफमास्टर दुनियादारी, दगडी चाळ, डबल सीट, क्लासमेट्स, धुरळा यांरख्या सुपरहिट चित्रपटांमुळे अंकुशला मराठीचा चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार, असे म्हटले जाते.


अंकुश हा मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुश ‘स्टार प्रवाह’वरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियअर्सचा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये अंकुशने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अंकुशची ही भूमिका खूप आवडली आहे. अंकुश आता ‘ऑटोग्राफ’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Read More
Marathi actor Ankush Chaudhari special post for ashok saraf
“माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५मध्ये…”, अंकुश चौधरीने अशोक सराफांबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…

अभिनेता अंकुश चौधरीने अशोक सराफ यांच्यासाठी लिहिलेली खास पोस्ट वाचा…

Ankush Chaudhari
अंकुश चौधरीने केली मोठी घोषणा! १३ वर्षानंतर ‘नो एंट्री पुढे धोका आहे’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ankush Choudhary: अंकुश चौधरी लवकरच नवीन भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज

Ankush Chaudhari New Movie : अंकुश चौधरीचे PSI अर्जुनमधील लूक पोस्टर पाहिले का?

Rinku Rajguru will appear in punha ekda sade made teen movie Siddharth Jadhav shared photos
‘पुन्हा एकदा साडे माडे ३’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू, चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला, सिद्धार्थ जाधवने फोटो केले शेअर

‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Actress Kranti Redkar told an interesting stories but the movie Jatra
‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान झालेला घोळ, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम; वाचा ‘जत्रा’विषयी न माहिती असलेल्या गोष्टी

‘कोंबडी पळाली’ या सुपरहिट गाण्यातील क्रांती रेडकरचे कॉस्च्युम डिझाइन केले होते ‘या’ अभिनेत्याने

ankush choudhary post on mumbai city and announces his new drama play
“५० वर्षे मुंबईत राहतोय, गिरणगावात मोठा झालो, पण…”, अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “ही अस्वस्थता…”

नमस्कार मी अंकुश चौधरी! अभिनेत्याने लिहिलं खास पत्र; म्हणाला, “गिरणगावात माझी सगळी दुनियादारी…”

ankush chaudhari says he never used bad words
“त्या दिवसापासून पुन्हा शिवी दिली नाही”, ‘लालबाग परळ’, ‘दुनियादारी’ चित्रपटांबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, “माझ्या आईने…”

“वाईट, अपशब्द…”, अंकुश चौधरीने वैयक्तिक आयुष्याबाबत केला खुलासा, म्हणाला…

Ankush Chaudhari new Reality show Mi Honar Superstar Jodi Number 1 will start form 9 march
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

ankush chaudhari deepa chaudhari
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आईचं काम कसं वाटलं? अंकुश-दीपा चौधरीचा मुलगा म्हणाला “मला…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आईचं काम कसं वाटलं? दीपा चौधरीच्या लेकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मला…”

deepa chaudhari rohini hattangadi
अंकुश चौधरीची पत्नी रोहिणी हट्टंगडी यांना ‘या’ नावाने देते आवाज, म्हणाली “तिचा अनुभव…”

आता ती दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकणार आहे.

संबंधित बातम्या