अंकुश चौधरी Photos

अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. अंकुश चौधरीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९७३ रोजी झाला. अंकुशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तो सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. नंतर त्याने एकांकिका, स्पर्धा, नाटक आणि मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली.


अंकुशने केदार शिंदेबरोबर केलेल्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकाला खूप यश मिळाले होते. त्यात अभिनेत्री दीपा परबदेखील अभिनय करीत असे. याच काळात अंकुश व दीपा यांच्यातील जवळीक वाढली आणि जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगाही आहे. अंकुशचे गोपाळा रे गोपाळा हे नाटकदेखील खूप गाजले होते. तसेच १९९९ मध्ये अंकुशने ‘हसा चकट फू’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सून येता घरी या चित्रपटातून अंकुशची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. जिस देश में गंगा रहता है या गोविंदाच्या हिंदी चित्रपटातही अंकुशने छोटी भूमिका साकारली होती. सावरखेड एक गाव, आई शप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, संशयकल्लोळ, चेकमेट, गैर, ब्लफमास्टर दुनियादारी, दगडी चाळ, डबल सीट, क्लासमेट्स, धुरळा यांरख्या सुपरहिट चित्रपटांमुळे अंकुशला मराठीचा चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार, असे म्हटले जाते.


अंकुश हा मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुश ‘स्टार प्रवाह’वरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियअर्सचा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये अंकुशने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अंकुशची ही भूमिका खूप आवडली आहे. अंकुश आता ‘ऑटोग्राफ’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Read More
Maharashtra Shaheer movie
18 Photos
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टिझरमध्ये लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण या दिग्गज व्यक्तींची झलक पाहायला मिळत आहे.