अण्णा हजारे Videos

अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.


अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठीही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला माहिती अधिकाराचा कायदा संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली.


Read More
Anna Hazare Reactions on Delhi CM Arvind Kejriwals ED arrest
Anna Hazare on Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे काय म्हणाले?, जाणून घ्या

कधीकाळी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, केंद्रातल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देशव्यापी आंदोलन उभं केलं त्या अण्णा हजारे यांनी…

Eknath Shinde
Eknath Shinde and Anna Hajare: लोकायुक्त विधेयकासाठी अण्णांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

राज्य विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून…