अनुराग ठाकूर Videos
भारतीय जनता पक्षाचे नेते अनुराग ठाकूर यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेश राज्यात हमिरपूर याठिकाणी झाला. २००८ साली हमिरपूरच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ साली देखील त्यांचा विजय झाला. सलग तीन वेळा त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. राजकारणाच्या व्यतिरीक्त क्रीडा क्षेत्रात अनुराग ठाकूर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. ते स्वतः भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात होते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, हिमाचल प्रदेशच्या क्रिकेट असोसिएशन, ऑलिम्पिक असोसिएशन, हॉकी, टेबल टेनिस संघटनांचेही अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१९ साली अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. तर जुलै २०२१ पासून माहिती आणि प्रसारण, युवक कल्याण आणि क्रीडा खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. Read More