अरिजित सिंह Videos
तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत अशी ओळख असणारा गायक म्हणजे अरिजित सिंह, अरिजितने आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अरिजित मूळचा बंगालचा असून तो मर्डर २ चित्रपटातील फिर मोहब्बत करने चला या गाण्यामुळे चर्चेत आला. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आशिकी चित्रपटातील तुम ही हो या गाण्याने त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पार्श्वगायनच्या बरोबरीने तो संगीताचे कार्यक्रमदेखील करतो. देशातच नव्हे तर परदेशात त्याचे कार्यक्रम होत असतात. शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मिथून, मॉन्टी शर्मा यासारख्या आघाडीच्या संगीतकारांकडे त्याने पार्श्ववगायन केले आहे.मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ब्रह्मास्त्र चित्रपटात त्याने केसरीया हे गाणे गायले ते अतिशय लोकप्रिय ठरले होते. 10 के 10 ले गये दिल या रिऍलिटी स्पर्धेत त्याने २०१० साली भाग घेतला होता विशेष म्हणजे तो या शोचा विजेता ठरलाRead More