अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने वडील आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलं. अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनचा पहिला चित्रपट ‘इश्कजादे’ अखेरीस २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतरच अर्जुनच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने २ स्टेट्स, गुंडे, हाफ गर्लफ्रेंड, की अँड का, मुबारका, नमस्ते इंग्लंड सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अर्जुनचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अर्जुनची सावत्र आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूरची जबाबदारी पेलली. तसेच सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो.Read More