अरशद खान (Arshad Khan) हा भारतीय गोलंदाज आहे. त्याने २०२१ मध्ये राज्यस्तरीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. तो मध्यप्रदेश संघाकडून खेळतो. २०२०-२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये अरशदला पहिल्यांदा मध्यप्रदेशच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्याकडे रणजी आणि सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे.
या स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने त्याला आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ऑक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आले. लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सला अरशद खानला संघामध्ये घेतले. या हंगामामध्ये दुखापतींमुळे त्याला एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. त्याच्या जागी कुमार कार्तिकेयला मुंबईच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये त्याला मुंबईकडून खेळवले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. Read More
Conductor assault for not speaking Marathi: मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर बेळगाव येथे केएसआरटीसीच्या कंडक्टरला मारहाण करण्यात आली. यानंतर तीन पुरूष…