अरविंद केजरीवाल News

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ साली झाला. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते. २०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केले आहे. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ आणि २०१९ सालीही आम आदमी पक्षाने दिल्लीत मोठा विजय मिळविला आणि अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीबरोबर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे.


दिल्ली सरकारने करोना काळात नवे अबकारी धोरण आखून त्या माध्यमातून मनी लाँडरींग केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षातील इतर नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. हे धोरण नंतर रद्द केले असले तरी या गुन्ह्याखाली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दीड वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही २१ मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली. लोकसभेदरम्यान पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांना काही दिवसांचा जामीन देण्यात आला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीत प्रवेश केला. मात्र त्यांना केवळ तीनच जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ला एकही जागा जिंकता आली नाही.


ईडीच्या कारवाई आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. केंद्रीय गृहखात्याने दिल्ली सरकारला असलेले प्रशासकीय अधिकार काढून घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचे अधिकार नायब राज्यपाल यांच्या हाती गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा नवा अध्यादेश काढून आपला निर्णय काम ठेवला.


Read More
delhi assembly elections
लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण? प्रीमियम स्टोरी

रोजगारनिर्मिती वा नोकरभरतीच्या मुद्द्यावर बहुधा शेवटची विधानसभा निवडणूक लढवली गेली ती बिहारमध्ये! त्यानंतर महाराष्ट्राच्या ‘लाडक्या बहिणीं’नी दाखवलेली रेवड्यांची लाट आता…

Arvind Kejriwal Car Attacked
Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप

Arvind Kejriwal : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

Delhi Election 2025 : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

bjp mla chitra wagh news in Marathi
गोंदिया : ‘…नाव घेते, सोडा माझा पदर’ ; चित्रा वाघ यांचा धम्माल उखाणा

केजरीवाल यांनी आपल्या सरकारचे उरलेले मोजके दिवस बद्दल विचार करावा, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?

दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार आहे, या निवडणुकीत आपला यश मिळणार की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack | मुंबई शहरातील सुरक्षिततेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?

Delhi Election 2024 : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दिल्लीच्या सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने मतदारांना कोणकोणती आश्वासनं दिली? जाणून घ्या…

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Net Worth : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे घर आणि कारही नाही… अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केली संपत्ती

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे,

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?

Saurabh bharadwaj vs Smriti irani : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास होकार दिल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच अरविंद केजरिवाल यांच्यावरही टीका केली आहे.

ताज्या बातम्या