अरविंद सावंत Videos

अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. अरविंद सावंत यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५१ रोजी झाला. त्यांनी बीएससीची पदवी घेतलेली आहे. अरविंद सावंत हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून त्यांना कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं. अरविंद सावंत यांनी १९९५ मध्ये नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर शिवसेनेत काम करत असताना ते गटप्रमुख, उपनेता, विधानपरिषद आमदार झाले. त्यानंतर २०१० मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून जबाबदारी मिळाली. पुढे दक्षिण मुबंईमधून २०१४ आणि २०१९ खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे पुन्हा एकदा खासदार झाले आहेत. मोदी २.० सरकारमध्ये अरविंद सावंत अवजड उद्योग मंत्री झाले होते. मात्र, शिवसेनने भाजपची साथ सोडल्यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


Read More
Maharashtra Vidhansabha Elections Arvind Sawant Vs Shaina N C Imported Item Comment Ladki Bahin Blame
विधानसभेच्या प्रचारात अरविंद सावंत असं काही बोलून गेले की आता उठतेय टीकेची झोड

Shaina NC Criticise Arvind Sawant : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत जातेय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिप्पण्यांना उत आलाय. दरम्यान, आपल्या उमेदवारांसाठी…

ताज्या बातम्या