आर्यन खान News
शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागच्या वर्षांपासून प्रकाशझोतामध्ये आहे. त्याचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला गेला. २०१६ मध्ये त्याने सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली. पुढे तो मायदेशी परतला. २००१ मध्ये त्याने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटामध्ये काही सेकंदांसाठी तो झळकला होता. <br />
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील ‘सिम्बा’ या प्रमुख पात्राला त्याने आवाज दिला. करोना काळामध्ये आर्यन खान खूप चर्चेत होता. एका क्रूझवर मित्रासह पार्टी करत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणी आर्यनसह क्रूझवर उपस्थित असणाऱ्यांवर खटले भरवण्यात आले. काही महिन्यांसाठी त्याला तुरंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मार्च २०२२ मध्ये पुराव्यांअभावी आर्यनची सुटका करण्यात आली.
तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आर्यन लेखक म्हणून शाहरुखच्या निर्मिती संस्थेमध्ये काम करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने स्वत:चा व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे. Read More