असदुद्दीन ओवेसी Videos

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.


अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.


अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.


Read More
Asaduddin Owaisi praised Maratha LeaderJarang Patil over maratha reservation
Asaduddin Owaisi on Manoj Jarange: “मनोज जरांगेंचं अभिनंदन करतो”; असदुद्दीन ओवैसींनी केलं कौतुक

एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी हे शनिवारी (१३ जुलै) छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी…

Navneet Ranas warning from Telangana Owaisi counterattacked
Asaduddin Owaisi and Navneet Rana: तेलंगणातून नवनीत राणांचा इशारा; ओवेसींनी केला पलटवार

भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपाच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. नुकतेच त्यांनी तेलंगणामधील…

Asaduddin Owaisi in Maharashtra to campaign for MIM candidate Imtiaz Jalil
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्रात | asaduddin owaisi

एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्रात | asaduddin owaisi

Asaduddin Owaisis criticism of Narendra Modi
Owaisi on PM Modi: ‘हिटलरनं ज्यूंबाबत जे केलं, ते भारतात…’ ; असदुद्दीन ओवैसींची मोदींवर खोचक टीका

गेल्या वर्षभरापासून ज्या चित्रपटाची चर्चा चालू होती, तो The Kerala Story चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्यातील दाव्यांवरून राजकीय…

ताज्या बातम्या