अशोक चव्हाण News
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशी ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.
यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. आता ते राज्यसभेत खासदार आहेत.
Read More