यंदा आशिया चषकाचे (Asia Cup 2023) चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताची आशिया चषकात २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध कॅंडीच्या मैदानात होणार आहे. स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. Read More
महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, शुक्रवारपासून सुरुवात होणार असून गतविजेत्या भारताची सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची गाठ पडणार आहे.