विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,
काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
भारतातील पहिल्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” मध्ये मोरावर उपचार सुरू आहेत. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याच्या मूळ निवासस्थानी म्हणजेच राजभवनात त्याला…
Uddhav Thackeray CM Devendra Fadnavis Meet: नागपूर विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट…