विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,
काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
Eknath Shinde in Assembly Session : मुख्यमंत्री शिंदे विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंचा उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही…