ज्योतिषशास्त्र Videos

ज्योतिषशास्त्राचा (Astrology) वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा अंदाज घेत गोष्टींबाबत अधिसूचना मिळवण्याच्या विद्येला ज्योतिषशास्त्र असे म्हटले जाते. ज्योतिष हा संस्कृत शब्द आहे. याची फोड केल्यास ज्योति आणि ईष/ईश असे दोन शब्द तयार होतात. यातील ज्योति या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारी गोष्ट असा लावला जाऊ शकतो.

तर ईशचा संबंध प्रदान करणारी या अर्थाने घेतला जातो. धोबळमानाने, मनुष्याला भविष्याच्या गर्द अंधारामध्ये प्रकाश देणारी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र असे आपण म्हणू शकतो. जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि त्यानंतर वेळोवेळी त्यांची बदलणारी स्थिती यांचा संयुक्त परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. ग्रहस्थितींच्या साहाय्याने भविष्याबाबत अंदाज लावण्याची प्रक्रिया ज्योतिषशास्त्रामध्ये पार पाडली जाते. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आयुष्य अधिक सुखकर होऊ शकते असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी लोक ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन सर्व निर्णय घेत असत. Read More
Astrologer Ulhas Gupte prediction on what happen in India in 2025
भारतात २०२५ मध्ये काय घडणार? ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंनी वर्तवला अंदाज

नव्या वर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जाणार आहे. मात्र…

ताज्या बातम्या