दिवंगत भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. १९९६ आणि १९९ मध्ये ते दोनदा पंतप्रधान पदावर निवडून आले होते. वाजपेयी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जायचे. राजकारण्यासोबत ते एक नावाजलेले कवी व लेखक होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वाजपेयी विद्यार्थी नेते म्हणून सामील झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं होतं. इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधी जे पी नारायण यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या वायपेयी यांना तुरुंगवास झाला होता. १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.Read More
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर आम्ही दिशाहीन झालो अशा शब्दांमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी विधानसभेत…
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याचे एनडीए सरकार या दोन्हींमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आहे.