अटलबिहारी वाजपेयी Videos

दिवंगत भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. १९९६ आणि १९९ मध्ये ते दोनदा पंतप्रधान पदावर निवडून आले होते. वाजपेयी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जायचे. राजकारण्यासोबत ते एक नावाजलेले कवी व लेखक होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वाजपेयी विद्यार्थी नेते म्हणून सामील झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं होतं. इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधी जे पी नारायण यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या वायपेयी यांना तुरुंगवास झाला होता. १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.Read More
Pankaj Tripathi on 'Main Atal Hoon' Movie
Pankaj Tripathi on ‘Main Atal Hoon’ Movie: पंकज त्रिपाठी वाजपेयींच्या भूमिकेविषयी नेमकं काय म्हणाले?

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…

ताज्या बातम्या