ऑटो न्यूज Videos
बदलत्या तंत्रज्ञानामुळे सध्या ऑटो क्षेत्रामध्ये जगात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांनाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनं, खरेदी करू लागले आहेत. मारुतीसह टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, किआ मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, जीप इंडिया आणि सिट्रॉनसह देशातल्या अनेक किफायतशीर आणि लग्झरी वाहन निर्मात्यांनी देशात नवनवीन वाहनं सादर केली आहेत. ही वाहन जबरदस्त तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. जगातील वाहनांचा सर्वात मोठा शो Auto Expo मध्ये देश विदेशातील दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपली वाहने सादर केली आहेत. दमदार मायलेज, इंजिन, फीचर्स आणि तंत्रज्ञानासह वाहने आता जगातच नव्हे तर देशातही लाँच होत आहेत. कार बाईक आणि स्कूटर नवनविन डिझाईनसह येत आहे. एवढेच नव्हे तर वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. एकंदरीत सांगायचे म्हणजे ऑटो क्षेत्रात अच्छे दिन सुरु झाले आहेत.Read More