ऑटो News
ऑटो उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते. अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.Read More