अक्षर पटेल हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा जन्म २० जानेवारी १९९४ रोजी गुजरातमध्ये झाला. तो गुजरात संघाकडून देशांतर्गत रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धा खेळला आहे. २०१४ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. पुढे २०१५ मध्ये त्याने क्रिकेटच्या टी२० प्रकारामध्ये पदार्पण केले. बराच काळ थांबल्यानंतर त्याला २०२१ मध्ये कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ७ गडी बाद केले. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरने मिहा पटेलशी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. Read More
Impact Player Rule : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने गुजरातविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. संघाच्या विजयानंतर…