बहुजन समाज पार्टी News

बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हा एक राजकीय पक्ष असून बहुजनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची स्थापना झाली होती. कांशीराम यांनी १९८४ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या (BSP) उद्दिष्टाचा दावा करतो. कांशीराम यांनी २००१ मध्ये मायावती यांना बहुजन समाज पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मायावती या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.


बहुजन समाज पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे. पक्षाची चारवेळा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाली आहे. चारहीवेळा मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. १९९५, १९९७, २००२ आणि २००७ साली बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. पक्षाला २००७ च्या विधानसभा निवडणुकीत २०६ जागांवर यश मिळाले होते. मात्र २०१२ मध्ये पक्षाला केवळ ८० जागा मिळाल्या. मायावती यांचे सरकार पडले आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागांवर यश मिळाले. परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांना या जागा टिकवता आल्या नाही. तसेच या पक्षाला निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्याचबरोबर पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील मतांची टक्केवारी देखील खालावली होती.


Read More
Manoj Sangole or Buddham Raut who is the official BSP candidate for the assembly elections 
अरेच्चा! पक्ष एक अन् उमेदवार दोन; आता पुढे काय?

बहुजन समाज पक्षाने उमेदवारी निश्चितीच्या घोळाची परंपरा कायम राखली आहे. पक्षाने बुद्धम राऊत यांना उत्तर नागपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव…

Dalit CMs in India list
Dalit CMs in India : सुशीलकुमार शिंदेंच्या निमित्ताने आढावा; देशातले ८ दलित मुख्यमंत्री कोण?

Dalit CMs in India list : देशात आतापर्यंत केवळ आठ दलित नेत्यांना वेगवेगळ्या राज्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Pa Ranjith challenge to Tamil Nadu parties over BSP leader killing
“आम्ही तुम्हाला का घाबरायचं?”; बसपाच्या नेत्याच्या हत्येनंतर दिग्दर्शक पा रंजीत काढलेल्या मोर्चामुळे राजकारण तापले

पा. रंजीत यांनी ‘कबाली’ (२०१६) आणि ‘काला’ (२०१८) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी भूमिका…

Chandrashekhar Aazad not with ruling side or Opposition in House
“कुणाच्या तरी मागे जाणारी मेंढरं आम्ही नाही”; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद संसदेत ना सत्ताधारी, ना विरोधकांच्या बाजूने!

. चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशमधील नगीना लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त करून संसदेत प्रवेश केला आहे. संसदेमध्ये आपण सत्ताधारी अथवा…

BSP Kanshi Ram Mayawati Bahujan Samaj Party risks losing national party status
एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

एप्रिल १९८४ साली कांशीराम यांनी या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर मायावती यांनी हा पक्ष आपल्या ताब्यात घेतला.

mayawati with akash anad
परिपक्व नाही म्हणणार्‍या पुतण्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी; यामागची नेमकी रणनीती काय?

मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय वारसदार आणि पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त…

candidates lost deposits
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी गमावली १६.४ कोटींची अनामत रक्कम; सर्वाधिक रक्कम गमावणारे उमेदवार कोणत्या पक्षाचे? प्रीमियम स्टोरी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ५४३ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ८,३६० उमेदवारांपैकी ७,१९४ उमेदवारांनी एकूण १६.३६ कोटी रुपयांच्या त्यांच्या सुरक्षा ठेवी…

Loksabha Election 2024 Mayawati Bahujan Samaj Party uttar pradesh
मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?

संपूर्ण देशभरात उमेदवार उभे करणाऱ्या काही मोजक्या राष्ट्रीय पक्षांपैकी एक असलेल्या बसपाला आता आपल्या घरातच मोठा फटका बसला आहे.