बहुजन समाज पार्टी Photos
बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हा एक राजकीय पक्ष असून बहुजनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची स्थापना झाली होती. कांशीराम यांनी १९८४ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या (BSP) उद्दिष्टाचा दावा करतो. कांशीराम यांनी २००१ मध्ये मायावती यांना बहुजन समाज पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मायावती या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.
बहुजन समाज पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे. पक्षाची चारवेळा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाली आहे. चारहीवेळा मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. १९९५, १९९७, २००२ आणि २००७ साली बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. पक्षाला २००७ च्या विधानसभा निवडणुकीत २०६ जागांवर यश मिळाले होते. मात्र २०१२ मध्ये पक्षाला केवळ ८० जागा मिळाल्या. मायावती यांचे सरकार पडले आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागांवर यश मिळाले. परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांना या जागा टिकवता आल्या नाही. तसेच या पक्षाला निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्याचबरोबर पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील मतांची टक्केवारी देखील खालावली होती.
Read More