बहुजन विकास आघाडी

बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aaghadi BVA) ही राजकीय आघाडी असून ती महाराष्ट्रातील वसई विरार भागामध्ये कार्यरत आहे. २००९ मध्ये तिची स्थापना झाली होती. या आघाडीला पूर्वी वसई विकास आघाडी असे संबोधले जात होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे या आघाडीचे संस्थापक आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पालघर मतदारसंघात विजय मिळवला होता. या जागेवरून बळीराम जाधव यांनी लोकसभा गाठली होती. बळीराम जाधव यांच्या रुपाने पक्षाला त्याचा पहिला संसद सदस्य मिळाला होता.


२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला दोन जागा जिंकण्यात यश आले होते. पक्षाने बोईसर आणि नालासोपारा या दोन जागांवर विजय मिळवला होता. बोईसर येथून विलास तारे तर नालासोपारा येथून क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या निवडणुकीत बोईसर आणि नालासोपारासह वसई मतदारसंघात विजयी पताका फडकवला होता. वसईतून हितेंद्र ठाकूर यांना विजय मिळाला होता.


बहुजन विकास पक्षाने २०१५ च्या वसई विरार महापालिका निवडणुकीतही चमकदार कामगिरी केली होती. पक्षाचे १०६ सदस्य निवडून आले होते. बहुजन विकास आघाडीच्या प्रविणा ठाकूर या वसईच्या पहिला महिला महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने आपले बालेकिल्ले जपण्यात यश मिळवले होते. बोईसर, नालासोपारा आणि वसईत पक्षाला पुन्हा विजय मिळाला होता.


बहुजन विकास आघाडी ही वसई विरार भागात प्रभावी असून महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तिने राजकारणातील आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत.


Read More
Bahujan Vikas Aghadi wiped out in vasai nalasopara boisar assembly election 2024, bastions of Thakur collapsed
बहुजन विकास आघाडीचे पानिपत तिन्ही उमेदवार पराभूत, ठाकूरांचे साम्राज्य खालसा

बहुजन विकास आघाडीच्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभेच्या जागांवर त्यांच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.

Virar Nalasopara Cash Scam Vinod Tawde was Planned to get caught by Fadnavis and shinde says Sanjay Raut Over comment by Hitendra Thakur
Hitendra Thakur: “एवढे उपद्व्याप करून…”; मतदानानंतर हितेंद्र ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यांनी विरारमधील विवांता हाॅटेलमध्ये नागरिकांना पैसे वाटले असा आरोप त्यांच्यावर होत आहे. मतदानाच्या एक…

Vinod Tawde vs Hitendra Thakur Virar Cash Clash Exclusive Intereview Which BJP Leader Gave Tip For Money In Virar Vivanta Hotel
Vinod Tawde vs Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले? Exclusive

Vinod Tawde Controversy Maharashtra Assembly Election 2024 : विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा…

Rajeev patil
आईने घातलेल्या भावनिक सादेमुळे माघार; निवडणूक लढवणार नाही – राजीव पाटील

राजीव पाटील यांचा भाजप प्रवेश सतत लांबणीवर पडत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली होती.

vasai bjp aggressive
कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते हवालदिल; केंद्रात, राज्यात सत्ता, मात्र वसईत कुणी दाद देईना

भाजप कार्यकर्त्याला मारहाण करूनही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने वसईतील भाजप कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.

vasai Bahujan vikas aghadi marathi news
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक

समाजमाध्यमावर बदनामी केली म्हणून भाजप कार्यकर्ते प्रतीक चौधरी यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात गाठून मारहाण केली.

Bahujan Vikas Aghadi leader Prashant Raut beaten
बहुजन विकास आघाडीचे नेते प्रशांत राऊत यांना मारहाण

बहुजन विकास आघाडी पक्षाचे नेते तसेच माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

संबंधित बातम्या