बहुजन विकास आघाडी Videos
बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aaghadi BVA) ही राजकीय आघाडी असून ती महाराष्ट्रातील वसई विरार भागामध्ये कार्यरत आहे. २००९ मध्ये तिची स्थापना झाली होती. या आघाडीला पूर्वी वसई विकास आघाडी असे संबोधले जात होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे या आघाडीचे संस्थापक आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पालघर मतदारसंघात विजय मिळवला होता. या जागेवरून बळीराम जाधव यांनी लोकसभा गाठली होती. बळीराम जाधव यांच्या रुपाने पक्षाला त्याचा पहिला संसद सदस्य मिळाला होता.
२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला दोन जागा जिंकण्यात यश आले होते. पक्षाने बोईसर आणि नालासोपारा या दोन जागांवर विजय मिळवला होता. बोईसर येथून विलास तारे तर नालासोपारा येथून क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या निवडणुकीत बोईसर आणि नालासोपारासह वसई मतदारसंघात विजयी पताका फडकवला होता. वसईतून हितेंद्र ठाकूर यांना विजय मिळाला होता.
बहुजन विकास पक्षाने २०१५ च्या वसई विरार महापालिका निवडणुकीतही चमकदार कामगिरी केली होती. पक्षाचे १०६ सदस्य निवडून आले होते. बहुजन विकास आघाडीच्या प्रविणा ठाकूर या वसईच्या पहिला महिला महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने आपले बालेकिल्ले जपण्यात यश मिळवले होते. बोईसर, नालासोपारा आणि वसईत पक्षाला पुन्हा विजय मिळाला होता.
बहुजन विकास आघाडी ही वसई विरार भागात प्रभावी असून महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तिने राजकारणातील आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत.
Read More