बॅंक हॉलिडे News
Bank Holiday च्या दिवशी बॅंकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. अशा वेळी आर्थिक व्यवहार करणे शक्य नसते. भारतामध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडियाद्वारे दर महिन्याच्या शेवटी पुढील महिन्याच्या बॅंक हॉलिडेबाबतचे वेळापत्रक सादर केले जाते. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक बॅंका पाहायला मिळतात. यातील राष्ट्रीय बॅंकांच्या शाखा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये असतात. तर प्रादेशिक बॅंकाच्या शाखा त्या राज्यापुरत्या मर्यादित असतात. या वर्गीकरणानुसार बॅंक हॉलिडे म्हणजेच बॅंकेतील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये गुढी पाडव्याला बॅंका बंद असतात, पण या दिवशी पश्चिम बंगालमधील बॅंका सुरु असू शकतात. १४ एप्रिल (आंबेडकर जयंती), २६ जानेवारी, १५ ऑगस्ट अशा दिवशी संपूर्ण देशांतील बॅंकेमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. या उदाहरणावरुन प्रादेशिक स्वरुपातील बॅंक हॉलिडे आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅंक हॉलिडे यांमधील फरक समजणे अधिक सोपे होऊ शकते.Read More