भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
Shahid Afridi on BCCI: चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीने २९ नोव्हेंबरला बैठक आयोजित केली आहे. यापूर्वी पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने बीसीसीआयवर…