बीसीसीआय न्यूज News
बीसीसीआयची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात डिसेंबर १९२८ मध्ये झाली होती. त्यानंतर १९३० मध्ये मद्रास सोसायटी अॅक्ट अंतर्गत या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फ भारतामध्ये तसेच भारताबाहेर खेळल्या जाणाऱ्या सामन्याबाबत नियोजन आणि नियंत्रण ठेवण्यात येते. बीसीसीआयला मोठा इतिहास आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारतीय क्रिकेटसंबंधित सर्व प्रकारचे निर्णय बीसीसीआयद्वारे घेण्यात येतात. सध्या रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहे. या सेक्शनमध्ये बीसीसीआयचे नियम, आयोजित सामने, इतिहास यांच्यासह चालू घडामोडींबाबतची तपशिलवार माहिती दिली जाणार आहे. यामध्ये बीसीसीआय संस्थेबद्दलचे प्रत्येक अपडेट्स वाचकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.Read More