बीसीसीआय महिला Videos
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत सर्व निर्णय घेतले जातात. डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआयच्या स्थापनेनंतर भारतामध्ये क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. इंग्लंडमध्ये पुरुषांप्रमाणे महिलादेखील क्रिकेट खेळत असतात. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिला क्रिकेट खेळू लागल्या होत्या. असे असूनही १९७० पर्यंत महिला क्रिकेटपटूंसाठी फायदेशीर असणारी बीसीसीआयसारखी कोणतीही संस्था देशामध्ये अस्तित्त्वात नव्हती. तेव्हा महेंद्र कुमार शर्मा यांनी पुढाकार घेत WCAI (Women’s Cricket Association of India) या संस्थेची स्थापना केली. १९७३ मध्ये त्यांनी या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून इंडियन सोसायटी अॅक्टच्या अंतर्गत लखनऊ येथे WCAI ची नोंदणी केली. याचे मुख्यालय पुणे शहरामध्ये होते. प्रमिला चव्हाण या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. WCAI च्या मदतीने भारतीय महिला क्रिकेट संघावे १९७६ मध्ये कसोटी, १९७८ मध्ये एकदिवसीय आणि २००६ मध्ये टी-२० सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. काही कारणांमुळे या संस्थेचे २००७ मध्ये बीसीसीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणापूर्वी राणी नरह या WCAI च्या अध्यक्षा होत्या.Read More