बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या काही विधानांवरून भावंडांमधील राजकीय दरी पूर्णपणे मिटली नसल्याचेही अर्थ काढले…