भंडारा Videos
भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More