भारती एअरटेल Photos

भारती एअरटेल लिमिटेह ही भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरवणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार १८ देशांमध्ये झाला आहे. सध्या एअरटेल 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत. तसेच देशातील काही ठराविक शहरांमध्ये ग्राहक एअरटेल 5G नेटवर्कचा वापर करु शकतात. १९७६ मध्ये सुनील भारती मित्तल यांनी भारती एंटरप्राईजेसची स्थापना केली. १९८४ मध्ये सुनील यांनी पुश-बटन फोन्सचा व्यवसाय सुरु केला. सिंगापूरच्या सिंगटेल कंपनीकडून ते फोन्सची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करु लागले. पुढे १९९० च्या आसपास भारती एंटरप्राइजेसने मोबाईल निर्मिती व्यवसायामध्ये प्रवेश केला. १९९२ मध्ये भारतामध्ये मोबाइल फोन नेटवर्कसाठीच्या परवान्यांचा लिलाव करण्यात आला होता. तेव्हा विवेंडी या फ्रेंच टेलिकॉम समूहासह करार करुन सुनील मित्तल यांनी टेलिकॉम नेटवर्कचा परवाना मिळवला. टेलिकॉम व्यवसायाला भविष्यामध्ये मोठी मागणी असणार आहे हे त्यांनी ओळखले होते. १९९४ मध्ये मित्तल यांच्या सर्व योजनांना सरकारने मंजूरी दिली. जुलै १९९५ मध्ये दिल्ली शहरात सर्वप्रथम एअरटेल सेवा सुरु झाली. सध्या एअरटेल हे भारतातील दुसऱ्या क्रंमाकाची टेलिकॉम नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे.Read More
viral meme on airtel
27 Photos
Photos: Airtel ने केली रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ; ट्विटरवर मिम्सचा सुरु झाला धुमाकूळ!

भारती एअरटेलने उचललेल्या या मोठ्या पावलानंतर, ट्विटर वापरकर्त्यांनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. पहा भन्नाट मिम्स