भारती सिंह Videos

भारती सिंह (Bharti Singh) ही हिंदी सिनेसृष्टीमधील एक अभिनेत्री आणि कॉमेडियन आहे. ३ जुलै १९८४ रोजी तिचा जन्म अमृतसरमध्ये झाला. भारती अवघी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्यामुळे तिच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तिचे बालपण गरीबीमध्ये गेले. मोठी स्वप्न बाळगणाऱ्या भारतीला ‘द ग्रेट लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे ओळख मिळाली. ती या कार्यक्रमामध्ये उपविजेते होती. पुढे तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करायला सुरुवात केली. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे तिच्या कामाचे कौतुक होऊ लागले.

‘खतरों के खिलाडी’, ‘झलक दिखला जा’, ‘द कपिल शर्मा शो’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती झळकली आहे. ती सूत्रसंचालन देखील करते. २०१७ मध्ये तिने लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. लग्नापूर्वी बरीच वर्ष ते एकमेकांंना डेट करत होते. त्यांनी मिळून ‘नच बलिये’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. एप्रिल २०२२ मध्ये भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव त्यांनी ‘लक्ष्य’ असे ठेवले असले तरी ते लाडाने त्याला ‘गोला’ म्हणून हाक मारतात.

२१ नोव्हेंबर २०२० रोजी अमली पदार्थविरोधी पथकाने भारतीच्या राहत्या घरावर छापा मारला. यामध्ये त्यांनी ८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी भारती आणि हर्ष यांना अटक करण्याच आले. दोन दिवसांच्या चौकशीनंतर २३ नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही जामीन मिळाला.
Read More

ताज्या बातम्या