Associate Sponsors
SBI

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
What did Uddhav Thackeray say at the event in Mumbai
Uddhav Thackeray: मुंबईतील कार्यक्रमात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray: मुंबईतील मुलुंड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली…

Asha Bhosle praised Deputy Chief Minister Eknath Shinde
Asha Bhosle: आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; म्हणाल्या, “मला तुमचा अभिमान वाटतो…”

Asha Bhosle: काल (९ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आशा…

Sushma Andhares scathing attack on Chief Minister Devendra Fadnavis and Raj Thackerays meeting
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर सुषमा अंधारेंचा खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Bjp election strategy through government schemes
सरकारी योजनांच्या माध्यमातून भाजपची निवडणूक मोर्चेबांधणी फ्रीमियम स्टोरी

लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत दिले.

What did Chief Minister Devendra Fadnavis say after meeting Raj Thackeray
Devendra Fadnavis: राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात…

CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

sandip deshpende gave a reaction on raj thackeray and cm devendra fadanvis meet
Sandeep Deshpande: “राजकीय भूमिका या वेगळ्या…”; संदीप देशपांडेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अचानक…

Delhi governance history
14 Photos
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण किती कार्यकाळ होतं? वाचा संपूर्ण यादी..

Delhi Chief Ministers List: दिल्लीच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले आहेत. शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्या, तर…

What did Sanjay Raut say about Chief Minister Devendra Fadnavis meeting Raj Thackeray
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.…

Pariksha Pe charcha 2025 PM Narendra Modi discussion with students
Narendra Modi Live: परीक्षा पे चर्चा-2025; पंतप्रधानांची विद्यार्थ्यांबरोबर चर्चा

Narendra Modi Live: आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यांर्थ्यांबरोबर…

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray in MArathi
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; संभाव्य युतीच्या चर्चेबाबत मुनगंटीवार म्हणाले, “नाशिकमध्ये जेव्हा…”

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

संबंधित बातम्या