scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
sangli lok sabha marathi news, sangli lok sabha election 2024
सातबारा, जमिनींची विक्री, तोट्यातील साखर कारखाना…सांगलीतील प्रचाराला वैयक्तिक वादाची किनार

महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष पाहण्यास मिळत असताना सांगलीत मात्र, महायुती विरूध्द अपक्ष असाच सामना अधिक रंगतदार बनू लागला…

Union Home Minister Amit Shah on Saturday asserted that only Prime Minister Narendra Modi government has the courage to stop infiltrators in the country
आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…

गुवाहाटीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीकाही केली.

jyotiraditya scindia
ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा मध्य प्रदेशमधील गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचार सभेदरम्यान शिंदे यांनी…

Amit Shah gave a explaination over loksabha election Regarding false propaganda by Congress
Amit Shah on Congress: ४०० पार घोषणेचा काँग्रेसकडून अपप्रचार; अमित शाहांनी दिलं स्पष्टीकरण

संविधान बदलण्यासाठी भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य आहे. भाजपा सत्तेत आल्यास आरक्षण संपवेल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप…

uddhav thackeray solapur sabha
10 Photos
Lok Sabha Election 2024 : सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण; ‘नकली शिवसेना’ विधानावरुन मोदी-शाहांना दिलं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी नकली शिवसेना या मोदींच्या वक्तव्यावर त्यांना उत्तर दिलं आहे.

Maharashtra Live News Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Live : “नरेंद्र मोदी हेच भटकती आत्मा”, नाना पटोले यांची टीका; इतर अपडेट वाचा एका क्लिकवर…

2024 Lok Sabha Election Live Updates, 30 April 2024 : महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर…

narendra modi at satara
13 Photos
Lok Sabha Election 2024 : संविधान, आरक्षण ते कलम ३७० साताराच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘या’ मुद्द्यांवर भाष्य

या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले….

Manoj Jarange Patil criticized BJP over loksabha election
Manoj Jarange Patil on Modi: “इथेच खरे मराठे जिंकले”; जरांगे पाटलांचा भाजपावर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचार संभाचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सलग तीन ते चार सभा घेत आहेत.…

Indore Congress Candidate Akshay Bam Withdraws Nomination Marathi News
Indore Lok Sabha Election 2024 धमक्या आणि छळामुळे इंदूरचे उमेदवार अक्षय बम यांची माघार, काँग्रेसचा भाजपावर गंभीर आरोप

Indore Congress Candidate Akshay Bam कैलाश विजयवर्गीय यांनी राहुल क्रांती बम हे भाजपात आल्याच जाहीर केलं होतं. आता भाजपावर काँग्रेसने…

Uddhav Thackeray Answer to modi
उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर, “नकली शिवसेना म्हणायला ती काही तुमची डिग्री नाही”

उद्धव ठाकरेंनी सोलापूरमधल्या सभेत नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं आहे तसंच ती काही तुमची डिग्री नाही असा टोला लगावला आहे.

BJP ready to give Thane Lok Sabha seat of Chief Minister Eknath Shinde to Shinde Shiv Sena
भाजपच्या संमतीअभावी ठाण्याचे ठरेना! सर्वेक्षणाचे हवाले देत प्रस्ताव नाकारल्याची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे लोकसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने आता दाखवली आहे.

संबंधित बातम्या