भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Thackeray brothers together after many years in Raj Uddhav in the same pavilion for nephews wedding
Video Title: ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्र! भाच्याच्या लग्नासाठी राज- उद्धव एकाच मंडपात

Video Title: ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्र! भाच्याच्या लग्नासाठी राज- उद्धव एकाच मंडपात

Revenue Minister Chandrasekhar Bawankule said amending Revenue Act for societys poorest is necessary
नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक

समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूली कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार, असे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

maharashtra cabinet portfolio allocation announced state cabinet announced in mahayuti read the full list
Cabinet Portfolio Allocation: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कुणाला कुठलं खातं?

Maharashtra Cabinet Portfolio : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा…

Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ

Pegasus vs Whats App : प्रायव्हसीचे उल्लंघन करत अनेक युजर्सच्या डिव्हायसेसमध्ये पेगासस स्वायवेअर इन्स्टॉल केल्याचा आरोप करत व्हॉट्सॲपने एनएसओ विरुद्ध…

Deputy Chief Minister Ajit Pawar met Somnath Suryavanshis family
Parbhani Somnath Suryavanshi Death: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी घेतली भेट

Parbhani Somnath Suryavanshi Death: परभणी हिंसाचार प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी स्वतः अजित पवार पोहोचले होते. शरद…

Cabinet Portfolio
Cabinet Portfolio : नितेश राणे, नरहरी झिरवाळ ते भरत गोगावले; महायुतीतल्या चर्चेतल्या ‘या’ पाच मंत्र्यांना कुठली खाती मिळाली?

चर्चेतल्या पाच मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळाली आहेत? जाणून घ्या कसं आहे महायुतीचं खातेवाटप?

constitution of india article 351
समोरच्या बाकावरून: राज्यघटनेसाठी काँग्रेसने काय केले?

राज्यघटना आणि काँग्रेस यांचा संबंध जोडताना भाजप आणि त्याचे मित्र पक्ष फक्त आणीबाणीचे दाखले देतात. पण गेल्या ७५ वर्षांमधली ती…

Chief Minister Devendra Fadnavis answered the question asked about account allocation
Devendra Fadnavis: खातेवाटपाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी दिली उत्तर; म्हणाले…

Devendra Fadnavis: महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही.याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार…

Sharad Pawar met Santosh Deshmukhs family
Sharad Pawar: शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाले…

Sharad Pawar: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेचे विधानसभा व लोकसभेतही पडसाद…

MP Jaya Bachchan Rajya Sabha Session
Jaya Bachchan : जया बच्चन यांची भाजपा खासदारांवर खोचक शब्दांत टीका, “ते पट्टीचे कलाकार, आता अभिनयाचा ऑस्करच…”

खासदार जया बच्चन यांची भाजपाच्या खासदारांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका

संबंधित बातम्या