Associate Sponsors
SBI

भारतीय जनता पार्टी Photos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Delhi governance history
14 Photos
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण किती कार्यकाळ होतं? वाचा संपूर्ण यादी..

Delhi Chief Ministers List: दिल्लीच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले आहेत. शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्या, तर…

Mahadev Jankar on Ajit Pawar EVM tempering
9 Photos
Uttam Jankar on EVM Tampering: ‘अजित पवार पराभूत, तर युगेंद्र पवारांना एवढे मतदान’, EVM छेडछाडीबाबत उत्तमराव जानकरांचा मोठा दावा

Uttam Jankar on EVM Tampering: ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यामुळेच महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)…

india alliance leaders protested against home minister amit shah statement about b r ambedkar
12 Photos
निळा टी-शर्ट, निळी साडी, हाती संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो; संसदेबाहेरील आंदोलनातील राहुल- प्रियांका गांधींच्या लूकने वेधले लक्ष

India Alliance Protest Again Amit Shah Photos : कालचा संपुर्ण दिवस या आंदोलनांनी गाजवला.

mahavikas aghadi protest in Nagpur against union home minister amit shah over his statement on babasaheb Ambedkar
10 Photos
Photos : अमित शाहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात मविआ आक्रमक; नागपूरात केले आंदोलन, पाहा फोटो

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवन परिसरात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

List of chairpersons of the Maharashtra Legislative Council and their tenure
18 Photos
कोणत्या पक्षाकडे किती काळ राहिलं विधानपरिषदेचं सभापती पद? महाराष्ट्र विधानपरिषदेत आतापर्यंत झाले ‘इतके’ सभापती

विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याला आतापर्यंत लाभलेले विधानपरिषद सभापती आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल…

amit shah press conference on dr Ambedkar
12 Photos
Photos : “माझ्या राज्यसभेतील विधानांची….”; गृहमंत्री अमित शाहांचे आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…

Amit shah on ambedkar marathi news : आंबेडकरांबद्दल नेहरूंच्या मनात द्वेष होता ही बाब जगजाहीर आहे. मोदी सरकारने मात्र आंबेडकरांचा…

Amruta Fadnavis Mangalsutra Design Nagpur Rally
15 Photos
Photos: उपराजधानीत देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत; चर्चा मात्र अमृता फडणवीस यांच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची

राज्याच्या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता त्याचे नागपूर विमानतळावर आगमन झाले.

Maharashtra Cabinet Expansion These MLAs from the Mahayuti allies got the ministerial post for the first time
18 Photos
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीतील ‘या’ आमदारांच्या गळ्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

Maharashtra CM oath ceremony attended by big celebrities
15 Photos
Photos : महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्याला नेत्यांसह सेलिब्रिटींची आणि उद्योगपतींची उपस्थिती, पाहा फोटो

सलमानसह शाहरुख खान आणि अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी महायुतीच्या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

ताज्या बातम्या