महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.
बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,
शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.