Engineer served notice for keeping chamber open during road work in Malad Mumbai print news
मालाडमध्ये रस्ते कामादरम्यान चेंबर खुले ठेवल्यामुळे अभियंत्याला नोटीस; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मालाड (पश्चिम) येथील दादीसेठ मार्ग येथे रस्त्याच्या कामादरम्यान मलनि:सारण प्रचालन कामासाठी चेंबरचे खोदकाम केल्यानंतर तेथे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन ते…

Engineer served notice for keeping chamber open during road work in Malad Mumbai print news
पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे बंद पडू देऊ नका… रेल्वेतील उदघोषणा सुरू ठेवा; महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

येत्या पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी, पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना आखाव्यात.

अनिश पाटील) कुणाल कामराविरोधातील राज्यभरात दाखल गुन्हे मुंबई पोलिसांना वर्ग नाशिक ग्रामीण, जळगाव, मनमाड येथील गुन्हे वर्ग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी राज्यभरात तक्रारी लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणाऱ्या हास्य कलाकार कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यात नाशिक ग्रामीण, जळगाव व नाशिक (नांदगाव) येथील प्रकरणांचा समावेश आहे. याप्रकरणी कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेकडून (शिंदे) मुरजी पटेल तक्रारदार आहेत. तीन गुन्हे वर्ग मनमाड येथील शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयुर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय दिगंबर भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. नाशिक नांदगाव येथील हॉटेल व्यावसायिक सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांसह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे. सर्व गुन्हे खार येथील कार्यक्रमातील कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल आहेत. ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते सर्व गुन्हे खार पोलिसांना वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील गुन्ह्याची माहिती शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी एका कार्यक्रमात असताना माझ्या मोबाइलवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामराने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता त्यामध्ये कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये शिवसेना व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत होता. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचे माहिती असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
भूखंड घेता का भूखंड… श्रीमंत मुंबई महापालिकेवर भूखंड विकण्याची वेळ का आली? किमती कमी करून तरी खरेदीदार मिळतील? फ्रीमियम स्टोरी

पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे उत्पन्न हे दोन महत्त्वाचे उत्पन्न स्रोत आहेत. येत्या काही वर्षांत दैनंदिन…

Residents demand relocation of goldsmiths in Kalbadevi Artisans and residents meet at municipal headquarters Mumbai print news
काळबादेवीतील सुवर्णकारागिरांना अन्यत्र हलवण्याची रहिवाशांची मागणी; पालिका मुख्यालयातील बैठकीत कारागीर आणि रहिवासी आमनेसामने

काळबादेवी, झवेरी बाजार परिसरातील रहिवासी भागामधीलल सुवर्ण कारागिरांना औद्योगिक परिसरात स्थलांतरित करावे अशी मागणी येथील रहिवासी संघटनांनी पुन्हा एकदा केली…

Additional Commissioner Abhijit Bangar directs to install nets on the banks of drains to prevent floating waste Mumbai
मुंबईतील नालेसफाईला सुरुवात, तरंगता कचरा रोखण्यासाठी नाल्यांच्या काठावर जाळ्या बसवाव्या – अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून नालेसफाईच्या कामांना नुकतीच सुरूवात करण्यात आली असून पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर…

Protests in three municipal hospitals against privatization Mumbai print news
खासगीकरणाविरोधात महानगरपालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये थाळीनाद आंदोलन

मुंबई महानगरपालिकेने पुर्नविकास केलेल्या वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाची विस्तारित इमारत, बोरिवलीतील भगवती रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंडमधील…

BMC discontinued cleanup marshal service
BMC Cleanup Service : क्लीनअप मार्शलची सेवा ४ एप्रिल पासून बंद होणार; वाढत्या तक्रारीमुळे पालिकेचा निर्णय

BMC Discontinued Cleanup Marshal Service : मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० क्लीनअप मार्शल याप्रमाणे संपूर्ण मुंबईसाठी…

Complaint to Human Rights Commission regarding Kanjurmarg garbage dump stench
कांजूरमार्ग कचराभूमी दुर्गंधीप्रकरणी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार

पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथील पालिकेच्या क्षेपणभूमीवरील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत असून या प्रकरणी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली…

संबंधित बातम्या