बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “१५ मार्च २०२४ रोजी पनवेल येथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते.”