बॉलिवूड न्यूज Videos

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More

ताज्या बातम्या