दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करतात. आपल्या घरातलं जसं जमा-खर्चाचं बजेट असतं, तशाच स्वरुपात आख्ख्या देशाचा जमा-खर्च या अर्थसंकल्पात मांडला जातो. देशाच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या गोष्टींचा उल्लेख यात केला जातो. देशाला कोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळणार आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च होणार आहे, याविषयी अर्थसंकल्पात निश्चित अशा तरतुदी असतात. जमापेक्षा खर्च जास्त असेल, तर त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. तर खर्चापेक्षा जमा जास्त असेल, तर त्याला शिलकीचा अर्थसंकल्प म्हणतात.