अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) Photos
दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करतात. आपल्या घरातलं जसं जमा-खर्चाचं बजेट असतं, तशाच स्वरुपात संपूर्ण देशाचा जमा-खर्च या अर्थसंकल्पात मांडला जातो. देशाच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या गोष्टींचा उल्लेख यात केला जातो. देशाला कोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळणार आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च होणार आहे, याविषयी अर्थसंकल्पात निश्चित अशा तरतुदी असतात.
या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच यावेळी निवृत्ती वेतनही वाढण्याची शक्यता आहे त्याकडे ज्येष्ठ नागरिकांचे डोळे लागले आहेत. निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी काय घोषणा होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Read More