बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे.