
कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.
पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.
हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.