करिअर Videos

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More

ताज्या बातम्या