सीबीएसई (CBSE)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील शाळांसाठींचे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मंडळ आहे. शासनाद्वारे या मंडळाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. १९२९ मध्ये सरकारच्या एका ठरावाद्वारे या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. माध्यमिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय एकत्रीकरण आणि सहकार्य यांसाठी हा प्रयोग सुरु केला गेला होता. या बोर्डाच्या घटनेमध्ये १९५२ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा मंडळाचे नाव Central Board of Secondary Education असे ठेवण्यात आले. देशातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ जुलै १९५२ रोजी मंडळाची पुनर्रचना केली गेली.

आत्ता आपल्या देशातील २७,००० पेक्षा जास्त शाळा या मंडळाशी संलग्न आहेत. त्याशिवाय २८ देशांमध्ये २४० शाळांचा समावेश देखील सीबीएससीमध्ये केला जातो. या मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा एनसीईआरटी अभ्यासक्रमाचे अनुकरण करतात. प्रामुख्याने इयत्ता ९ ते १२ पर्यंत या अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवले जाते. भारतासह जगभरातील ४० भाषांचा वापर यामध्ये केला जात आहे. निधी छिब्बर (आयएएस) या सीबीएससी मंडळांच्या प्रमुख आहेत.

भारत पारतंत्र्यामध्ये असताना हे मंडळ सुरु करण्यात आले होते. आता या मंडळाची मोठी व्याप्ती आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या बोर्डातून उतीर्ण होत असतात. नुकताच या बोर्डाचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षीही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Read More
Maharashtra government schools news in marathi
अन्वयार्थ : वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि सीबीएसई पॅटर्न

सीबीएसईप्रमाणे’चा हा अट्टहास काही नवा नाही. अभियांत्रिकी आणि वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांत महाराष्ट्राची मुले मागे पडू नयेत, यासाठी दीड…

Supriya Sule on CBSE Board
Supriya Sule on CBSE Board: ‘मी स्वतः SSC बोर्डाच्या शाळेत शिकले’, CBSE बोर्डाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, शिक्षक आहेत का?

Supriya Sule on CBSE Board: एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर खासदार…

CBSE 10th Board Exam
CBSE 10th Board Exam : दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार; CBSE चं नवीन धोरण कधीपासून लागू होणार?

CBSE 10th Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत नवीन धोरण ठरवलं आहे.

BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी

पालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला प्रथमच बसणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागासाठी ही एक मोठी घटना आहे.

CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांना संकेतस्थळावर कर्मचारी आणि अन्य माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.

kerala schools separate syllabus
अन्वयार्थ : मूल्यमापनाची ‘परीक्षा’

देशातील शिक्षणाची दशा मांडणारे वेगवेगळे अहवाल दर वर्षी प्रसिद्ध होतात आणि त्यात वरच्या इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्याला त्याने ‘उत्तीर्ण’ केलेल्या इयत्तेतील…

maharashtra board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : एप्रिलमध्ये सुट्टी नाही, मे महिन्यात गृहपाठ… राज्यमंडळाच्या शाळांचे वेळापत्रकही सीबीएसईप्रमाणे? प्रीमियम स्टोरी

आता सीबीएसईप्रमाणेच राज्यमंडळाच्या शाळांच्या परीक्षा मार्चमध्ये संपल्या की १ ते ३० एप्रिल पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येईल. मे महिन्यात…

maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?

राज्य मंडळातील अभ्यास समित्यांनी सीबीएसईसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांच्या आधारे गणित आणि विज्ञान या दोन विषयांचा अभ्यासक्रम तयार केला. मात्र,…

CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
अभ्यासक्रमाशिवाय राज्यातील शाळांचे वार्षिक वेळापत्रक आता ‘सीबीएसई’नुसार… काय आहे निर्णय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा एससीईआरटीने जाहीर केला होता.

maharashtra education board made major change in hsc and hsc exam pattern like cbse
‘सीबीएसई’ प्रमाणे स्टेट बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल, कॉपी करून उत्तीर्ण होण्याच्या….

सीबीएसईच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला असून त्यामुळे कॉपी करून उत्तीर्ण होणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

cbse pattern in state board exams marathi news
अन्वयार्थ : ‘सीबीएसई’च्या इयत्तेत जायचे म्हणजे काय?

राज्यातील माध्यमिक शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’च्या धर्तीवर करण्याची घोषणा पुन्हा एकदा झाली आहे.

CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…

सध्या राज्यभरात कॉन्व्हेंट शिक्षण पद्धतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉन्व्हेंट संस्कृती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहर आणि तालुक्यांच्या ठिकाणांसह मोठ्या गावांतही…

संबंधित बातम्या