सीबीएसई (CBSE) Photos
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील शाळांसाठींचे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मंडळ आहे. शासनाद्वारे या मंडळाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. १९२९ मध्ये सरकारच्या एका ठरावाद्वारे या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. माध्यमिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय एकत्रीकरण आणि सहकार्य यांसाठी हा प्रयोग सुरु केला गेला होता. या बोर्डाच्या घटनेमध्ये १९५२ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा मंडळाचे नाव Central Board of Secondary Education असे ठेवण्यात आले. देशातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ जुलै १९५२ रोजी मंडळाची पुनर्रचना केली गेली.
आत्ता आपल्या देशातील २७,००० पेक्षा जास्त शाळा या मंडळाशी संलग्न आहेत. त्याशिवाय २८ देशांमध्ये २४० शाळांचा समावेश देखील सीबीएससीमध्ये केला जातो. या मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा एनसीईआरटी अभ्यासक्रमाचे अनुकरण करतात. प्रामुख्याने इयत्ता ९ ते १२ पर्यंत या अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवले जाते. भारतासह जगभरातील ४० भाषांचा वापर यामध्ये केला जात आहे. निधी छिब्बर (आयएएस) या सीबीएससी मंडळांच्या प्रमुख आहेत.
भारत पारतंत्र्यामध्ये असताना हे मंडळ सुरु करण्यात आले होते. आता या मंडळाची मोठी व्याप्ती आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या बोर्डातून उतीर्ण होत असतात. नुकताच या बोर्डाचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षीही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.Read More